खरेदी-विक्री मुद्रांक शुल्कात 3% सवलत ; प्रभाव क्षेत्रासाठी 3% तर ग्रामीणसाठी भरावा लागणार २% मुद्रांक शुल्क

हातकणंगले /ता.१-प्रतिनिधी  

        आजपासून राज्य शासनाने खरेदी-विक्रीच्या मुद्रांक शुल्कात घसघशीत सवलत दिली आहे . 1 सप्टेंबर पासून खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क तीन टक्‍क्‍यांनी कमी केला आहे. प्रभावक्षेत्र , महानगरपालिका , नगरपालिकेसह शहरी भागासाठी ३% तर ग्रामीण भागासाठी निव्वळ २% मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे. तर रक्ताच्या नात्यातील बक्षीस पत्रासाठी दोनशे रुपये मुद्रांक शुल्क व दोनशे रुपये नोंदणी फी भरावी लागणार आहे. मात्र रक्ताचे नाते सोडून अन्य व्यक्तीच्या बक्षीसपत्रकारिता जुन्या पद्धतीनेच मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे .या सवलतीचा लाभ ३१ मार्च २०२० पर्यंत रहाणार आहे.
       यापुर्वी प्रभावक्षेत्र , महानगरपालिका , नगरपालिकेसह शहरी भागासाठी 6% तर ग्रामीण भागासाठी ५% मुद्रांक शुल्क भरावा लागत होता. मात्र नोंदणी शुल्क जुन्या नियमाने १% भरावा लागणार आहे. बाकी अन्य व्यवहारांसाठी जुन्या पद्धतीनेच मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे. सध्याची मुद्रांक शुल्क आकारणी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत असुन एक जानेवारीपासून यामध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ होणार असुन या सवलतीचा लाभ ३१ मार्च २०२० पर्यंत रहाणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागतच होऊन जनतेला दिलासा मिळाला आहे . यामुळे खरेदी-विक्री व्यवहारात वाढ होवून याचा राज्य शासनाला अल्प प्रमाणात फायदा होईल. मात्र याचा सर्वांत जास्त नफा बिल्डर लॉबीला होईल . अशी प्रतिक्रिया मुद्रांक विक्री व दस्त लेखणीक संघटनेतून बोलली जात आहे .

error: Content is protected !!