ईगल तायक्वांदो अॅकॅडमीचे यश

खोची : जिल्हा क्रीडा कार्यालय व छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठवडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत खोची व नरंदे येथील ईगल तायक्वांदो मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी यश संपादन केले. आरती कुंभार, धनश्री मगदूम, समृद्धी भोरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच रसिका कुंभार प्रांजल सुतार, सुरभी बंडगर, श्रुतिका मुळीक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांना खेळाडूंना कार्याध्यक्ष अमोल सुतार, हरिश्चंद्र गायकवाड, प्रतिभा पाटील, अमोल भिरगणे, रोहित शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.

error: Content is protected !!