व्यंकटराव हायस्कूलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत श्रावणी संजय जाधव हिने १९ वर्षाखालील गटामध्ये ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. त्यानंतर तिची बिकानेर (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. क्रिश किरण मोरे १९ वर्षाखालील गटात ८१ किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल व्यंकटराव हायस्कूलच्यावतीने दोन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यांना जूनिअर कॉलेजचे श्री. पदरे, क्रीडा शिक्षक बरगाले व माळी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मुख्याध्यापक ए. ए. खोत, उपमुख्याध्यापिका ए. एम. कांबळे, पर्यवेक्षक एम.एस. खराडे, एस. एस. कुंडले, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

error: Content is protected !!