इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवत प्रेमी युगलाची आत्महत्या

ज्याच्यावर प्रेम कराल त्याच्यासोबत मरायला पण तयार आहे. प्रेम करताना त्याची जात-धर्म बघून प्रेम करू नका. कारण सगळीच सारखे नसतात. अशी इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवत प्रेमी युवलानी आत्महत्या केली. एकाच दोरीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली. पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथे ही घटना घडली. या दोघांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.


सानिका नानासो निकम (वय-16), अरबाज शब्बीर पखाली (वय-18) अशी गळफास घेतलेल्या प्रेमीगुलांची नावे आहेत. आज सकाळी साडेसात वाजता नातेवाईकांना गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळून आलेत. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. मात्र आत्महत्येचे नेमकं कारण समजले नाही. आत्महत्या करण्यापूर्वी रात्री त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांच्या आठवणीचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर आज सकाळी दोघांनीही आत्महत्या केल्याचं समोर आले. दोघांनाही तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात आणले यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!