कबनूर येथे मराठा समाजाच्या उपोषणला पाठिंबा

“मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे काळाची गरज आहे. तेव्हा शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे.” असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केले.
कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण मागणीसाठी शुक्रवार ता.१ डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे.साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री.पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.त्यावेळी ते बोलत होते.

साखळी उपोषणाच्या आजच्या नवव्या दिवशी
संजय जाधव,अशोक बंडू पाटील,श्रीधर पाटील हे उपोषणाला बसले आहेत.मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या लढ्याचा आढावा घेतला.सुनील इंगवले,शिवाजी चव्हाण,बाबासाहेब कोकणे,अरुण इंगवले,जीवन यादव, युवराज पाटील,महेश शिऊडकर,दत्तात्रय पाटील,प्रशांत जगताप,स्वरूप पाटील,सुनील माने,विकास फडतारे,मनोज जाधव,आनंदा कदम,दत्तात्रय शिंदे,रघुनाथ हळवणकर,बाळासो कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर, रावसाहेब खवरे,पै.अण्णासो निंबाळकर,नितीन गवळी,मनोहर सूर्यवंशी, संदीप जाधव,चंद्रकांत वाकरेकर,देवाप्पा खुडे,संभाजी वाकरेकर,उत्तम यादव,प्रकाश ढोले, अमोल लाड,शिवाजी कदम,नंदकुमार वाकरेकर, विजय निंबाळकर,रवींद्र रामसे आदी उपस्थित होते.
दरम्यान ज्येष्ठनेते पुंडलिकराव जाधव,बी. डी.पाटील,मिलिंद कोले,प्रा.अशोक कांबळे,अपेक्षा कांबळे,मनीषा कांबळे आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

error: Content is protected !!