काँग्रेसचा धरणे आंदोलन करुन देशव्यापी बंदला पाठिंबा

   केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात, या मागणीसाठी आज शुक्रवारी हातकणंगले तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने वतिने धरणे आंदोलन करण्यात आले.

   केंद्र सरकारने हुकूमशाही पध्दतीने कारभार करत शेतीविषयक कायदे मंजूर करुन ते अंमलात आणण्याचा मोठा खटाटोप सुरु ठेवला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असणारे हे कायदे रद्द करावेत. या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अनेक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे.सरकारने केवळ चर्चेचा दिखावा केला. पण अन्यायकारक शेतीविषयक कायदे रद्द करण्याची मागणी मान्य केली नाही. तिन्ही शेतीविषयक कायदे हे शेतकर्‍यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे आहेत. या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेसने पाठींंबा दिला आहे. 60 लाख शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍यांचे राष्ट्रपतींना निवेदन देऊन शेतीविषयक कायदे रद्द करण्याची मागणीही केली आहे. अन्यायकारक शेतीविषयक कायदे आणि महागाईच्या विरोधात केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी संघटनांनी आज शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी संपूर्ण भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी हातकणंगले तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने हातकणंगले येथे सकाळी अकरा वाजले पासून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मोदी -शहा सरकार. हटाव ,देश बचाव अशा घोषणा दिल्या. अन्यायकारक शेतीविषयक कायदे रद्द करावेत ,अशीही मागणी करण्यात आली.

   यावेळी आम. राजू आवळे, तालुका अध्यक्ष भगवान जाधव, नगराध्यक्ष अरुण जाणवेकर ,बाजीराव सातपुते, शकील आत्तार, डॉ .विजय गोरड, युवराज पाटील, अरुण पाटील, राज कचरे, भैरवणाथ पवार, महम्मद महात, शंकर शिंदे, महिपती दबडे, प्रल्हाद घाटगे, रमेश देसाई, अनिल जमादार, बाबोसो नाईक, पिंटू किणींगे, अमर पाटील, यांच्या सह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!