कोरोची संरपंचांच्या अपात्र निर्णयास स्थगिती

कबनूर

कोरोची येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी गावातील काही कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जावर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सरपंच संतोष भोरे हे सरपंच पदासाठी अपात्र ठरले असल्याचे जाहीर केले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सरपंच अपात्रेच्या निर्णयाला अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोची तालुका हातकणंगले येथील संतोष वाघेला देवानंद कांबळे श्याम आठवले लखन कांबळे राजेंद्र कसबे यांनी १८ जानेवारी २०२३ ला तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या न्यायालयात सरपंच संतोष मोरे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केली होती या तक्रार अर्ज मध्ये कोरोची येथील गायरान जमिनीत अतिक्रमण केल्याचे आरोप केला होता.
दरम्यान सरपंच संतोष भोरे यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या विरोधात अपील दाखल केले. या अपिलावर पुणे विभागीय आयुक्त कविता त्रिवेदी यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या निर्णयास स्थगिती देणे उचित होईल. पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.

error: Content is protected !!