तळसंदे ग्रामसेवकास शिवीगाळ ; सदस्यावर गुन्हा दाखल

तळसंदे ता. हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे नोटीस वेळेत का दिली नाही या कारणांवरून झालेल्या वादातुन तळसंदे येथील ग्रामसेवक सुनील कोंडीबा सुतार यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य अमित चंद्रकांत मोहिते यांचेवर वडगाव पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. तळसंदे ग्रामपंचायतीची १ एप्रिलला मासिक सभा सुरू होती. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित मोहिते यांनी सभागृहाचा दरवाजा जोरात आपटला. व ग्रामसेवक सुनील सुतार यांना तुम्ही मला ग्रामसभेची नोटीस एकच दिवस अगोदर का दिली असा जाब विचारत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुतार यांनी वडगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार पतंगराव रेणुसे तपास करत आहेत. सदर घटनेचा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निषेध केला असल्याची माहिती हातकणंगले तालुका अध्यक्ष आर.एस. मगदूम यांनी दिली.

error: Content is protected !!