छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी तावडे हॉटेल इथे कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक कडेलोट

कोल्हापुर /ता : १० राजेंद्र शिंदे

             कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावातील बसवलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा एका रात्रीत काढला. कर्नाटक सरकारकडून सतत मराठी भाषिकांच्या वर कुरघोडी करण्याचे काम चालू असते . आता तर कर्नाटक प्रशासन अखंड हिंदुस्तानाचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असेल तर आमच्या भागात असणाऱ्या कानडी माणसांना आम्ही ह्या भागात राहू देणार नसल्याचे मत करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी गांधीनगर तावडे हॉटेल चौकात बोलताना व्यक्त केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा . अशी मागणी उपतालुकाप्रमुख पोपट दांगट व हिंदुत्ववादी शरद माळी यांनी केली.
            युवासेना समन्वयक सागर पाटील व मा. उपतालुका प्रमुख विक्रम चौगुले यांनी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो व ‘कर्नाटक सरकारचा धिक्कार असो’ या घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे कडेलोटची शिक्षा दिली जात होती . त्याप्रमाणे गांधीनगर तावडे हॉटेल चौकात राष्ट्रीय महामार्गावरून कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला वरून फेकून कडेलोटची शिक्षा देण्यात आली.
           यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, हिंदुत्ववादी शरद माळी, युवासेनेचे सागर पाटील, सचिन नागटीळक, प्रफुल्ल घोरपडे, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, विभागप्रमुख दीपक पोपटानी, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनिल पारपाणी, गडमुडशिंगीचे राहुल गिरुले, बाळासाहेब नलवडे, अनिल माळी, भूषण चौगुले, किशोर कामरा, रवी रोहिडा, बंडा पाटील, धनराज माने , पवन गजवानी, बाबासो तामगावे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!