लाच घेताना जीएसटी विभागातील कर निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापुरात जी एस टी भरले नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी टायर विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून १० हजार रुपयांची लाच घेताना जीएसटी विभागातील कर निरीक्षकाला रंगेहात अटक केली.

विशाल बाबू हापटे (वय 35 रा. हातकणंगले) असे कर निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध पथकाने मंगळवारी (दि. ५) दुपारी कसबा बावडा येथे केली. पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!