वारणानगर, ता. 5/शिवकुमार सोने
शिक्षक दिना निमित्त ‘लिंक्ड इन लोकल कोल्हापूर ‘ वरती भारताची नवी शिक्षण पद्धत – संधी, जबाबदारी,आव्हाने यावरती मार्गदर्शन करण्यासाठी वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ जाॅन डिसुझा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मुळात ‘लिंक्ड इन लोकल कोल्हापूर’ हे वेबिनार भारतातील ५२ चाप्टर मधील एक आहे.’लिंक्ड इन’ वरील ओळखीतून प्रत्यक्ष भेट, मान्यवरांशी थेट संवाद साधला जावा . यासाठी आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना रोजगारासंबधी मार्गदर्शन, इंडस्ट्रीमधील संधी, यशस्वी उद्योजक यांची ओळख करण्याचाच या चाप्टरचा उद्देश आहे.
वेबिनार मध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे स्थानिक रोजगार,कुशल मनुष्यबळ निर्मितीतुन नवा समाज कसा घडेल? त्यांच्या संशोधक वृत्तीतून नवा भारत उभा राहू शकतो का ?
अश्या अनेक गोष्टी या वेबिनार वरती प्राचार्य डाॅ.जाॅन डिसुझा आपल्या अभ्यासातुन व्यक्त करणार आहेत. या वेबिनारला सहभागी होणार्या प्रत्येकाला ‘लिंक्ड इन लोकल कोल्हापूर’ यांच्या तर्फे सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
