साहेब सांगा आम्ही शिकवायच कधी…? शाळाबाह्य कामामुळे शिक्षकांची व्यथा…

मनिष कुलकर्णी
   देशाची नवी पिढी संस्कारी व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम घडविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक. सध्याच्या धावत्या जगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, क्रिडा, कला, स्पर्धा परीक्षा यांसारख्या अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज शिक्षक धडपड करत आहेत. वेळवेगळे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये धाडस निर्माण केले जात आहे. पण शाळाबाह्य कामामुळे आता यासाठी वेळ अपूरा पडत आहे. 
   अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या शिक्षक भरतीमुळे अपुऱ्या संख्येवर अनेक शाळा चालू आहेत. यातच भर म्हणून शिक्षकांना अनेक शाळाबाह्य कामांसाठी वेळ द्यावा लागत आहे. १० ते ५ शाळा करून शिक्षकांना अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांच्यावर वाढत आहे.
  मतदार याद्या तयार करणे, दुरुस्ती, विविध प्रकारचे सर्व्हे, जनगणना, ऑनलाईन शासकीय माहिती भरणे, निवडणूक ड्युटी यांसारख्या ६५ पेक्षा जास्त कामे आज शिक्षकांना करावी लागत आहे. 
  सर, तुम्हीच समाजातील सुज्ञ व सजग नागरिक असं म्हणूनच कायम अशी कामं शिक्षकांवर लादली जात आहेत. याचा नकळत का होईना तोटा मात्र शैक्षणिक गुणवत्तेला विद्यार्थ्यांना बसत आहे. 
   ही सर्व जबाबदारी पार पाडत असताना, विचार करा साहेब तुम्हीच विद्यार्थीदशेत असताना अशी कामे त्यावेळच्या शिक्षकांना असती तर तुम्ही आधिकारी, नेते, लोकप्रतिनिधी अथवा पदाधिकारी झाले असता काय ? साहेब,आता तुम्हीच सांगा शिक्षणा व्यतिरिक्त कामे करून आम्ही शिकवायच कधी...?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!