कल्पनेच्या जगात काहीही होऊ शकतं. नुसत्या कल्पना करणारे अनेक जण असतात, पण त्या सत्यात उतरवणारे खूपच कमी असतात. त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वस्तू हव्या असतात. असेच अनेकजण मूळ गाडी विकत घेतात आणि नंतर ती मॉडिफाय करतात. कार किंवा बाईक मॉडिफिकेशन ही काही नवी कला नाही, पण आपल्या Maruti Suzuki Wagon R गाडीवरुन मॉडिफाइड लिमोझिन ( Modified Limousine version) तयार केली तर विश्वास बसणार नाही. पण हा कारनामा करून दाखवलाय पाकिस्तानातील लाहोरच्या काही जणांनी. ही गाडी कुणी तयार केली, त्यात कसे बदल केले, त्याचा मालक कोण याची माहिती उपलब्ध नाही. gadiwadi.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.

वॅगनार ही भारतातील हॅचबॅक सेगमेंटमधली (Hatchback Segment) सर्वाधिक लोकप्रिय गाडी आहे. भारतीय रस्त्यांवर ही गाडी अगदी सहज दिसते. तिची विक्रीही सर्वाधिक आहे त्यामुळे मारुती कंपनीने लवकरच संपूर्ण इलेक्ट्रिक वॅगनार (Full Electric Wagon R) रस्त्यांवर उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. ही कार जशी भारतात लोकप्रिय आहे तशीच इतर देशांतही, पाकिस्तानातही प्रसिद्ध आहे. या बातमीत म्हटलंय की पाकिस्तानात (Pakistan) वॅगनारचं मॉडिफाइड लिमोझिनसारखं दिसणारं व्हर्जन लाहोरमध्ये तयार करण्यात आलं असून, तिथंच ते रजिस्टरही केलेलं आहे. सुझुकी कंपनी पाकिस्तानात वॅगनार विकते पण त्याचे सुटे भाग इंडोनेशियातून (Indonesia) करून ते पाकिस्तानात एकत्र सांधले जातात आणि वॅगनार गाडी तयार होते.
या वॅगनार लिमोझिनमध्ये सीटच्या तीन रांगा आहेत. पैकी मधल्या सीटचं मागच्या बाजूला तोंड केलेलं आहे. सगळ्यात मागची सीट ड्रायव्हरकडे तोंड करून आहे. कारला सहा दारं आहेत म्हणजे प्रत्येक प्रवाश्याला गाडीत बसायला किंवा उतरायला दार आहे, असं या गाडीच्या फोटोवरून दिसत असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
पुढच्या सारखीच मधल्या रांगेतील दारं आहेत. मागच्या बाजूच्या तिसऱ्या रांगेतील दारं ही नेहमीच्या वॅगनारला असतात तिच आहेत. या कारचा व्हिलबेसही (Wheelbase) वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात विकल्या जाणाऱ्या स्टँडर्ड वॅगनारसारखाच या मॉडिफाइड गाडीचा बाहेरचा लूक आहे.
या मॉडिफाइड वॅगनार लिमोझिनमध्ये तीन सिलिंडर पेट्रोल इंजिन (Petrol Engine) असून त्याची क्षमता 660 सीसी इतकी आहे.
ही वॅगनार सध्या 26 लाख पाकिस्तानी रुपयांना (साधारण 11.85 लाख भारतीय रुपये) विक्रीसाठी उपलब्ध आहे. या वॅगनारचं मूळ मॉडेल 2015 चं आहे त्यात एसी, एअरबॅग्ज, पॉवर लॉक्स, पॉवर विंडोज, एबीएस, रेडिओ आणि इतर फीचर्स उपलब्ध आहेत. आता ही कार विकत घेणं शक्य नसलं, तरीही फोटो पाहून मॉडिफाय करणाऱ्यांना दाद देण्यासारखी आहे.
संदर्भ News 18 लोकमत