वृद्धाला लूटमार व मारहाण केल्याप्रकरणी एकाला दहा वर्षांची सक्तमजुरी

वृद्धाला अडवून लूटमार व मारहाण केल्याप्रकरणी राहुल ऊर्फ गोग्या रामू गवळी (वय 31, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी गुरुवारी दहा वर्षांची सक्तमजुरी व चार हजार दंड ठोठावला. दि. 13 मार्च 2018 मध्ये या घटनेत श्रीधर पांडुरंग पवार (वय 63, रा. निटवडे, ता. भुदरगड) यांचा मृत्यू झाला होता. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली होती.

पवार यांना वाटेत अडवून आरोपीने खिशातील मोबाईल व पैसे काढून घेतले होते.
प्रतिकाराचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तोंडावर, डोक्यात, छातीवर ठोसे मारून वृद्धाला जखमी केले होते. जमिनीवर आदळल्याने गंभीर इजा झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी गवळीला अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. यावेळी आठ साक्षीदार तपासण्यात आले.

error: Content is protected !!