कुरुंदवाडात पुरातन हनुमान मंदिर जीर्णोद्धार टप्यात

कुरुंदवाड : येथील पुरातन हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हनुमान जयंती या नवीन मंदिरात साजरी केली जाणार आहे. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम श्री हनुमान मंदिर भक्त चॅरिटेबल ट्रस्ट विठ्ठल मंदिर चौक कुरुंदवाड यांच्यामार्फत पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन मंदिर बांधकाम हाती घेतले आहे. हे मंदिर भाविकांच्या वर्गणीतून साकारत आहे. बांधकामाचा खर्च सुमारे १२ लाख असून भाविकांनी देणगी द्यावी, असे आवाहनही केले आहे.

error: Content is protected !!