प्रेयसीसाठी प्रियकर गेला मुलगी बनून पेपरला

    पंजाबच्या फरिदाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी काय करेल याचा नेम नसतो. तसाच एक प्रकार उघड झालाय. प्रेयसी देत असलेल्या परीक्षा स्वत: देण्यासाठी बॉयफ्रेंडने हास्यास्पद प्रयत्न केला आहे. तो स्वत: आपल्या प्रेयसीसारखा पेहराव करुन परीक्षा केंद्रावर गेला होता. पण, एका चुकीमुळे तो पकडला गेला.

प्रेयसी आरोग्य विभागातील एका पदासाठी परीक्षा देणार होती. पण, तिच्या एवजी प्रियकरानेच परीक्षा देण्याचं ठरवलं. यासाठी त्याने संपूर्ण तयारी केली होती. कपडे आपल्या प्रेयसीसारखे घातले. टिकली लावली, लिपस्टिक लावली, बांगड्या घातल्या. इतकेच नाही तर त्याने ओखळपत्र म्हणून खोटे आयडी कार्ड आणि आधारकार्ड देखील बनवून घेतले होते.

अंग्रेज सिंग असं प्रियकराचं नाव असून आपली प्रेयसी परमजीत कौर याच्यासाठी त्याने हा जुगाड केला होता. जेव्हा तो परीक्षा केंद्रावर आला तेव्हा त्याला बायोमॅट्रिक डिव्हाईसमध्ये फिंगरप्रिंट देण्यास सांगण्यात आले. यावेळी मात्र तो फसला आणि सगळा प्रकार समोर आला. परमजीत हिचा परीक्षेसाठीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!