वधुवराचा लग्नातील अनोखा उपक्रम ; समाजापुढे एक नवा आदर्श

हातकणंगले /प्रतिनिधी

   हातकणंगले येथील पृथ्वीराज प्रकाश पाटील व रोहिणी राजाराम भोकरे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला . शासकीय नियमानुसार अवघ्या पन्नास लोकांना घेऊनच पाटील -भोकरे परिवाराने हा विवाह सोहळा आनंदात पार पडला .पण सध्या सुरु असलेले करोना (corona) जागतिक महामारीचे संकट आणि त्यामुळे रुग्णांना अपुरा पडणारा रक्तसाठा याचा विचार करून या नवदाम्पंत्याने आपल्या विवाह दिवशी रक्त दान करून युवा पिढीला एक नवा संदेश दिला आहे .

  करोणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने दिवसेंदिवस रक्ताचा तुटवडा जाणवत आहे .यासाठी वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) तसेच आरोग्य विभागामार्फत रक्तदान करण्यासाठी वांरवांर आवाहन करण्यात येत आहे .या आव्हानाला साथ देण्यासाठी व या युवा पिढीला संदेश देण्यासाठी आपण रक्तदान (Blood donation) केल्याचे मत पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले .

   त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .


error: Content is protected !!