लॉकडाऊनची आज-उद्या CM घोषणा करतील- बाळासाहेब थोरात

मुंबई / प्रतिनिधी

  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अशी माहिती दिली आहे की राज्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. आज किंवा उद्या मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतील अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, मुख्यमंत्री याबाबत अंतिम एसओपी करत आहेत. गरीब लोकांना काय दिलासा देता येईल याबाबत सरकार विचार करत असल्याचं ते म्हणाले.

 कोरोनामुळे आज राज्यभर अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा (Gudhi Padwa 2021) साजरा केला जात आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील घरी साधेपणाने पाडवा साजरा केला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी , ‘गेलं वर्ष आणि हे वर्ष देखील कोरोना मध्ये गेलं आहे. राज्य संकटात आहे. राजकारणात चढ उतार होत असतात पण राजकारण हे लोकांसाठी करतो असतो. कोरोनाचे संकट दूर होवो अशी प्रार्थना केली.

error: Content is protected !!