इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग करून ठेवली, सुरु करताच आगीत जळून खाक झाली

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथे ई बाईक सुरू करताच बॅटरीमधून धुरा आला व क्षणार्धात दुचाकीने पेट घेतला. या दुर्घटनेत गाडी चालक सुखरूप बचावला. मात्र आगीत दुचाकीची सीट व इतर साहित्य जळून खाक झाले.

चंद्रकांत उर्फ बजरंग पळसे यांची इलेक्ट्रिक दुचाकी आहे. पळसे यांनी आपली दुचाकी चार्जिंग करून ठेवली होती. कामासाठी बाहेर चालले असता त्यांनी गाडीचा स्वीच ऑन करताच गाडीच्या डीकीतून धूर येऊ लागला. पळसे यांनी सीट उघडली असता गाडीने तात्काळ पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दुसरी घटना

वाटेगावातील पळसे कुटुंबाच्या घरासमोर यापूर्वी मागील दोन वर्षांपूर्वी पळसे यांच्या मालकीच्या ई बाईकने पेट घेतला होता. रविवारी पुन्हा दुसऱ्यांदा दुसऱ्या ई बाईकने पेट घेतला.

error: Content is protected !!