कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय)
वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर covid vaccine भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8 लाख 22 हजार 002 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण 39 हजार 987 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 19 हजार 993 जणांनी दुसरा डोस घेतला. 48 हजार 898 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 16 हजार 536 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील व 45 वर्षावरील व्याधीग्रस्त व्यक्ती यामध्ये इतर व्याधी असलेल्या 3 लाख 53 हजार 851 नागरिकांनी पहिला डोस तर 21 हजार 118 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर 60 वर्षावरील एकूण 3 लाख 79 हजार 266 नागरिकांनी पहिला डोस तर 50 हजार 303 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 8 लाख 22 हजार 002 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 08 हजार 020 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.