सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा न पाहता तात्काळ आरक्षण द्यावे-संतोष सावंत

कबनूर ता.१४-“आतापर्यंत मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी खूप लढा दिला आहे.सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा न पाहता तात्काळ आरक्षण द्यावे.अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल.”असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे इचलकरंजी शहराध्यक्ष संतोष सावंत यांनी केले.
कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी एक डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे साखळी उपोषणाच्या आजच्या चौदाव्या दिवशी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला त्याप्रसंगी श्री.सावंत बोलत होते.

साखळी उपोषणाच्या चौदाव्या दिवशी जयदीप इंगवले नामदेव कारंडे हे उपोषणाला बसले आहेत.मराठा समाजाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.यावेळी माजी उपसरपंच रावसाहेब खवरे,मराठा महासंघाचे जिल्हा संघटक अरविंद माने,विजय मुतालिक,सुनील इंगवले, बाबासाहेब कोकणे,दत्तात्रय पाटील,दिग्विजय इंगवले,प्रशांत जगताप,युवराज पाटील,शिवाजी चव्हाण,बाळू कदम,प्रा.विजय निंबाळकर,नानासो भोसले,उमाकांत लोंढे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठनेते बी.डी.पाटील,माजी सरपंच सुनील स्वामी,डॉ.अनिल पाटील,आनंदा कदम, आर.बी.पाटील,बी.जी.देशमुख,सुनील माने,जीवन यादव किरण खांडेकर,अनिल चौगुले,महादेव इंगवले,विष्णू चव्हाण,रवींद्र धनगर, चंद्रकांत कारंडे,युवराज चव्हाण,सुधीर कृष्णात पाटील,संदीप येरुडकर,ओंकार किंदलकर,केरबा कदम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!