महिलांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार दृढ होईल : महाडीक

कोल्हापूर

महिलांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा विचार अधिक दृढ होईल, असे प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले. समिधा प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी पेठेतील सुमन सांस्कृतिक भवन येथे आयोजित विविध स्पर्धांच्या बक्षीस समारंभावेळी त्या बोलत होत्या.
या स्पर्धेचे संयोजन अनुराधा गोसावी, प्रियांका जोशी, अमित कांबळे, ऋतुराज नढाळे, शुभंकर गोसावी यांनी केले. स्वागत अजित ठाणेकर यांनी केले. भाजपच्या रूपाराणी निकम, दीपा ठाणेकर उपस्थित होत्या. या वर्षी शालेय विद्यार्थिनींसाठी दोन गटांमध्ये रामरक्षा पठण, साथसंगतीसह आणि साथसंगतीविना अशा दोन गटांमध्ये राम गीत गायन स्पर्धा, राम पर्व या विषयावर रांगोळी स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त चुलीवरची भरड धान्याची भाकरी अशा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. यावेळी तृप्ती देशपांडे, अपर्णा खिरे व जयश्री कजारिया यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार देण्यात आला. स्वरदा फडणीस यांनी ‘नीर आणि निरजा’ यावर मार्गदर्शन केले. वेदा सोनुले-झुरळे आणि कविता बंकापुरे यांनी परीक्षण केले. आभार ओंकार गोसावी यांनी मानले.

error: Content is protected !!