ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा

आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. जोगेश्वरी येथील भूखंड गैरवापर प्रकरणी ईडीने वायकर यांच्या ७ ठिकाणांवर ही छापेमारी केल्याची माहिती आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंच्या घरावर आयकर विभागाचा छापा टाकल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार रवींद्र वायकरांनंतर आता खासदार राजन विचारे टार्गेटवर असल्याची त्याचबरोबर तपास संस्थांकडून आज ठाकरे गट निशाण्यावर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.राजन विचारे सध्या ठाण्यातील हिरानंदानी परिसरात राहतात. ठाण्यातील अन्य एका घरावर देखील धाड टाकण्यात आली आहे. विचारेंच्या जुन्या घरामसोर असलेल्या कार्यलयावर देखील आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच आयकर विभागाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!