होळी व रंगपंचमीच्या साठी बाजारपेठ सजली

मनिष कुलकर्णी

 हिंदू वर्षातील शेवटचा सर्वात मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांचा सण म्हणून देशभरात या दिवशी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली जाते. देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी सण साजरा केला जातो.

होळीसाठी संपूर्ण बाजारपेठ रंगीबेरंगी रंगांनी सजली आहे. लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या व नवनवीन स्वरूपाच्या पिचकारी बाजारामध्ये आल्या आहेत‌. लहान मुलांसाठी वेगवेगळे वाजंत्री देखील उपलब्ध आहेत. संपूर्ण बाजारपेठ रंगमय झाली आहे.

error: Content is protected !!