मारहाण करुन मोबाईल लुटला

मेव्हण्यास सोडण्यासाठी गेलेल्या तरुणास मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल लुटल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील मार्केट यार्ड परिसरात घडली. यामध्ये डोंगाप्पा बसप्पा पुजारी (वय २९ रा. गोकुळ शिरगांव मुळ रा. बदामी, कर्नाटक) जखमी झाले असून, त्यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. यानुसार चार अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डोंगाप्पा पुजारी त्यांचा मेव्हणा सुरेशला रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी निघाले होते. मार्केट यार्ड येथील रेल्वे ब्रीज रोडनजीक ते आले असता, चार अनोळखी हल्लेखोरांनी दुचाकी थांबवली. डोंगाप्पा व सुरेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या दोघांना अंधारामध्ये नेऊन त्यांच्याकडील मोबाईल हिसडा मारुन लंपास केले व हल्लेखोरांनी पलायन केले. यानंतर या दोघांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस अण्यात दिली

error: Content is protected !!