डोंगराला लागली आग ; वनखात्याचे अधिकारी अनाभिज्ञ

हातकणंगले / प्रतिनिधी

   अतिग्रे (ता. हातकणंगले ) गावानजीक असणाऱ्या डोंगराला रविवारी अचानक आग लागली. आगीला संबंधित वन विभागाकडुन प्रतिबंध केला नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. व आग श्री. क्षेत्र रामलिंग , अलंमप्रभु , व कुंथुगिरी डोंगरावर पसरली . त्यामुळे येथील झाडाझुडपांचे व अन्य औषधी झाडवेली अशा नैसर्गिक संपत्तीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
    याबाबत हातकणंगले पोलिसांनी या संदर्भात आम्हाला लेखी अगर तोंडी कोणतीही कल्पना नसल्याचे सांगुन वनखात्याचे अधिकारी फोनही उचलत नसून ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे उत्तर हातकणंगले पोलिसांनी दिले.

  हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे, मुडशिंगी, आळते या गावालगत असलेल्या डोंगरात छोट्या-मोठ्या पर्वत रांगा आहेत. यामध्ये रामलिंग, धुळोबा, अलंमप्रभू व कुंथुगिरी अशी धार्मिकस्थळे याच डोंगरात आहेत. डोंगर माथ्यावर नैसर्गिक लहान-मोठ्या झाडांचे जंगल आहे. हा संपुर्ण परिसर वन खात्याच्या ताब्यात आहेत. येथील झाडा-झुडपांचे संरक्षणाबरोबरच नैसर्गिक वनसंपदा वाढवणे आणि तिचे संगोपण करणे हे वन खात्याचे काम आहे.

    परंतु काही वर्षांपासून या डोंगरमाथ्यावरील काही उपद्रवी नागरिकांकडून वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून जंगलात असणाऱ्या पशू आणि पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेली आठ ते दहा वर्षे एप्रिल व मे महिन्यात या डोंगरावर आग लावली जाते. तरीही वन खाते याबाबात गांभीर्याने न घेता कर्तव्यात कसूर करीत आहे. त्याची चौकशी होऊन वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरीकांतुन केली जात आहे.

error: Content is protected !!