राज्य सरकार उचलणार शेतकऱ्यांच्या विजेचा ‘भार ‘ ; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

  शेतकऱ्यांना (Farmers) दिवसा वीज देण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून ११ हजार ५८५ कोटी तसेच कृषी वाहिन्यांच्या सौर उर्जीकरणासाठी आशियायी पायाभूत गुंतवणूक बँकेकडून ९,०२० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या आठवड्यात झालेल्या सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत २६ निर्णय घेण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात व त्यांच्या सोयीच्या कालावधीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (Chief Ministers Solar Agriculture Vahini Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अडचणी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा यासाठी नव्याने काही निर्णय घेण्यात आले आहेत.
error: Content is protected !!