कुंभोज येथे गाईंची चोरी

हातकणंगले / प्रतिनिधी
कुंभोज येथील कोळीवाडा अमृत धाब्याच्या शेजारील चौगुले (भोसे ) यांच्या मुक्त गोठ्यातून नऊ महिन्यांच्या गाभण असणाऱ्या दोन गाईची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली असुन दोन्ही गाईंची किमंत अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये आहे . घटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली असुन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली आहे .
याबाबत आधिक माहीती अशी कि , कुंभोज- हातकणंगले मार्गावर गोमटेश्वर चौगुले (भोसे ) यांचा मळा व मुक्त गाईंचा गोठा आहे . गोठ्यामध्ये एकुण वीस गाई होत्या . गोमटेश्वर चौगुले यांचा मुलगा प्रमोद चौगुले हे रात्री दोन नंतर गोठ्यावर झोपण्यासाठी गेले असता वीस गाईंमध्ये दोन गाई नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले. प्रमोद यांनी तात्काळ वडिलांना फोनवरून दोन गाई चोरीस गेल्याचे सांगितले. घरातील सर्व मंडळींनी मुक्त गोठ्याकडे धाव घेतली. स्वतःच्या व इतरांच्या शेतातून शोधाशोध सुरू केली. पण गाई कुठे दिसुन आल्या नाहीत.
त्यानंतर चौगुले यांनी चोरीची तक्रार हातकणंगले पोलीसात दिली आहे .

error: Content is protected !!