भुयेत चिमुकल्यांनी भरवला आठवडी बाजार

भुये (ता. करवीर) भोगी व मकर संक्रांतीचे औचित्य साधून विद्या मंदिर, भुये शाळेतील चिमुकल्यांनी आठवडी बाजार भरवला होता. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यवहार ज्ञान समजावे, खरेदी-विक्रीची माहिती व्हावी, तसेच कौशल्याच्या विकासासाठी प्राथमिक स्तरावर त्यांना अनुभव मिळावा, यासाठी शाळेत ‘बाल बाजार’चे नियोजन करण्यात आले. यामध्ये भाजीपाला, स्टेशनरी, खाद्य पदार्थ, धान्य, मसाले याची देवाण-घेवाण झाली. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी मुख्याध्यापक श्रीकांत खैरे, नम्रता माने, दीप्ती माने, धनश्री स्वामी, शरद पाटील, बाजीराव पाटील यांचे सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!