इचलकरंजी बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ

इचलकरंजी येथील बसस्थानकावर सलग दुसऱ्या दिवशी दोन एसटी गाड्यांमध्ये महिलांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. चोरट्यानी महिलांच्या अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ज्योती संजय बेनाडे (वय ३३, रा. रांगोळी) रांगोळीला जाण्यासाठी एसटीमधून जात होत्या. यावेळी ३० हजार रुपये किमतीचे १ तोळे मनीमंगळसूत्र कापडी पिशवीतून चोरले. तसेच कागल मार्गावरील हुपरीकडे जाणाऱ्या विद्या अरुण कांबळे (५०) यांच्या हातातील सोन्याची पाटली चोरीला गेली. चोरट्याने कटरने डाव्या हातातील दीड तोळे वजनाची गोल चपटी डिझाईनची असलेली पाटली चोरल्याची फिर्यादीत नमूद केले आहे. दोन्ही घटनांमध्ये सोन्याच्या सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!