वारणा महाविद्यालयात ग्राहक जागृती व वित्तीय साक्षरता विषयावर वेबिनार संपन्न

वारणानगर / प्रतिनिधी
    वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय व कंझ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “कोविड-१९” च्या काळातील “ग्राहकवाद आणि वित्तीय साक्षरता” या विषयावर राज्यस्तरीय वेबिनारचे येथे आयोजन करण्यात आले होते.

वारणानगर: येथील य.च.वारणा महाविद्यालयातील वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना प्राचार्य डाॅ प्रकाश चिकुर्डेकर, दिनेश भंडारे,अर्चना भिंगार्डे,अॅड.राजेश कोठारी,स्नेहा आपटे

   वेबिनारचे महाविद्यालयातील अर्थशास्त्र, इतिहास, वाणिज्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. वेबिनार साठी वारणा विभाग शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.विनयरावजी कोरे, प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.सौ.वासंती रासम यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.
   वेबिनारचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले.यावेळी प्राचार्य चिकुर्डेकर म्हणाले, महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांच्यामध्ये ग्राहक जागृती आणि वित्तीय साक्षरता येणे गरजेचे आहे. प्रथम वेबिनारमध्ये वक्ते म्हणून मुंबई येथील कंझ्युमर्स सोसायटीचे दिनेश भंडारे व श्रीमती अर्चना भिंगार्डे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
  दिनेश भंडारे म्हणाले,’विविध बहुराष्ट्रीय कंपन्या नानाविविध मार्गाने ग्राहकांची फसवणूक करतात. त्यामुळे ग्राहकांनी स्वतःची फसवणूक टाळावी. याविषयी दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे त्यानी दिली. ग्राहकांची फसवणूक झाली. तर ग्राहकपाल यांच्याकडे तक्रार करून ग्राहक स्वतःचे संरक्षण करू शकतो असेही त्यानी सांगितले.तर दुस-या वक्त्या श्रीमती अर्चना भिंगार्डे म्हणाल्या,’ आयुष्यात वित्तीय नियोजन करताना, बचत कशी करावी . व केलेली बचत कोठे गुंतवावी . पैसे साठविल्याने पडून राहतात तर गुंतवल्याने वाढतात. मॅच्युअल फंड व शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीम संरक्षित करण्याचे विविध मार्गतत्वेही त्यांनी सांगितली.
   दुस-या वेबिनार मध्ये मुंबई येथील कंझ्जुमर्स सोसायटीचे ॲड.राजेश कोठारी व श्रीमती स्नेहा आपटे यांनी मार्गदर्शन केले.ॲड. राजेश कोठारी यांनी ग्राहक संरक्षण विषयक भारतीय कायदे आणि त्या अंतर्गत कशी दाद मागावी याविषयी माहिती दिली. श्रीमती स्नेहा आपटे यांनी वित्तीय साक्षरतेचे अनेक मार्ग स्पष्ट करून सांगितले.
    वेबिनारमध्ये २५० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग नोंदविला . कोविड-१९ च्या काळात ग्राहक जागृती व वित्तीय साक्षरता निर्माण होण्याच्या दृष्टीने वेबिनार उपयुक्त ठरला. या वेबिनारचे संयोजन डॉ.चंद्रकांत जाधव यांनी केले. वक्त्यांचा परीचय टी.आर.पांडे यांनी करून दिला. स्वागत व प्रास्ताविक डॉ.डी.आर. धेडे व प्रा.रोहित बसनाईक यांनी केले. तर प्रा.उमेश जांभोरे व डॉ.रंगराव कावणे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत जाधव यांनी करत आभार मानले.

error: Content is protected !!