आजअखेर जिल्ह्यात 63 हजार 16 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका)

   काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 1345 प्राप्त अहवालापैकी 988 अहवाल निगेटिव्ह तर 324 अहवाल पॉझिटिव्ह (29 अहवाल नाकारण्यात आले तर 4 अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 1479 प्राप्त अहवालापैकी 1231 अहवाल निगेटिव्ह तर 248 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 722 प्राप्त अहवालापैकी 298 निगेटिव्ह तर 424 पॉझीटिव्ह असे एकूण 996 अहवाल पॉझीटिव्ह तर एकूण 46 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
    जिल्ह्यात आजअखेर एकूण 77 हजार 76 पॉझीटिव्हपैकी 63 हजार 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 11 हजार 440 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 996 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-2, भुदरगड-74,चंदगड-48, गडहिंग्लज-62, गगनबावडा-1, हातकणंगले-73, कागल-28, करवीर-138, पन्हाळा-76, राधानगरी-4, शाहूवाडी-20, शिरोळ-55, नगरपरिषद क्षेत्र-63 कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 194, इतर जिल्हा व राज्यातील-158 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-1704, भुदरगड- 2053, चंदगड- 1805, गडहिंग्लज- 2553, गगनबावडा- 301, हातकणंगले-7632, कागल-2415, करवीर-8851, पन्हाळा- 3012, राधानगरी-1646, शाहूवाडी-2183, शिरोळ- 4323, नगरपरिषद क्षेत्र-10 हजार 143, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 23 हजार 825 असे एकूण 72 हजार 446 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 4 हजार 630 असे मिळून एकूण 77 हजार 76 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
   जिल्ह्यातील एकूण 77 हजार 76 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 63 हजार 16 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 2 हजार 620 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 11 हजार 440 इतकी आहे.

error: Content is protected !!