ट्रॅक्टच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा हाकनाक बळी

   वाटंगी ( ता.आजरा ) येथे ट्रॅक्टरचे पाठीमागील चाक सम्राट दयानंद मलगोंडे ( वय ३ वर्ष ) या चिमुकल्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरासमोर घडली. अविनाश आनंदा मलगोंडे यांनी घराच्या दारात शेडच्या चढावाला ट्रॅक्टर लावला होते. हा ट्रॅक्टर अचानक पाठीमागे येऊन शेजारी खेळत असलेल्या सम्राटच्या डोक्यावरून गेले. 

खेळत असलेला सम्राट त्याच ठिकाणी रक्तबंबाळ होऊन पडला. घराशेजारील नागरिकांनी आरडाओरड करताच ट्रॅक्टरला दगड लावून थांबविण्यात आले. यावेळी सम्राटच्या आईने फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणार होता. बेजबाबदारपणे शेडच्या चढावाला ट्रॅक्टर लावल्याप्रकरणी अविनाश मलगोंडे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहायक फौजदार कविता कदम करीत आहेत.

error: Content is protected !!