कबनूरमध्ये बारा एकर ऊस आगीत भस्मसात

कबनूरमध्ये येथील ओढ्याजवळील साखर कारखाना बायपास रस्त्याजवळील सुमारे बारा एकरातील ऊस आगीत भस्मसात झाला. शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगा साखर कारखाना रस्त्याजवळील उसाच्या फडास आग लागली. बघता बघता आग पसरली. आगीने रौद्ररूप धारण केले. पंचगंगा कारखान्याच्या दोन अग्निशामक गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशामक दलाला मर्यादा पडल्या. परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. दोन तासांनी आग आटोक्यात आली. जयकुमार कोले, सुभाष कोले, अण्णासो निंबाळकर या शेतकऱ्यांच्या सुमारे बारा एकर शेतीतील ऊस भस्मसात झाला. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

error: Content is protected !!