अडीच लाख भाविकांनी घेतले जोतिबाचे दर्शन

दख्खनचा राजा जोतिबा यांच्या चौथ्या खेट्यादिवशी तब्बल अडीच लाख भाविक जोतिबा चरणी लीन झाले. चैत्र यात्रेच्या सुरुवातीला जोतिबाचे खेटे सुरु होतात. रविवार दि.१७ रोजी जोतिबाचा चौथा खेटा होता. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंद्रप्रदेश येथील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते. तब्बल अडीच लाख भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेतले.

यावेळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला. तर चैत्र यात्रेच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडून चोख नियोजन सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर नुकत्याच बैठका पार पडल्या असून प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी जोतिबा मंदिरात भेट देऊन चैत्री यात्रेचा आढावा घेतला आहे.

error: Content is protected !!