दुचाकीच्या अपघातात दोघे जागीच ठार

बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर धुमडेवाडी फाट्यानजीक दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे जागीच ठार झाले. सुरेश रामू पाटील (वय ५०, रा. निट्टूर) व भगवान आनंद सदावर (३८, रा. सदावरवाडी) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
सुरेश पाटील हे अथर्व- दौलत कारखान्यावर उसाचे भरलेले ट्रॅक्टर अड्ड्यात लावून घरी जात होते, तर भगवान सदावर आपल्या दुचाकीवरून पाटणे फाट्यावरून सदावरवाडी गावाकडे जात होता. धुमडेवाडी फाट्यानजीकच्या वळणाचा अंदाज आला न आल्याने दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली.

दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. जोरदार धडकेत दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले.

error: Content is protected !!