ट्रकचा टायर फुटून मोटरसायकलला धडक , दोघा मोटरसायकलस्वारांचा मृत्यू

गारगोटी / आनंद चव्हाण

   गडहिंग्लज कडुन गारगोटीकडे चाललेल्या ट्रकचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून समोरून येणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल वरील दोघेजण मृत्यूमुखी पडले तर ट्रक बाजूच्या शेतात पलटी झाल्याने चालक व क्लीनर जखमी झाले. हा अपघात काल पांगिरे (ता.भुदरगड) गावाशेजारी पेट्रोल पंपानजीक घडला .

             पांगीरे (ता भुदरगड ) येथे झालेल्या अपघातातील ट्रक व मोटारसायकल अशी रस्त्यावर पडली आहे.

  गडहिंग्लजहून कोरीवकाम केलेली दगडे घेऊन ट्रक गारगोटीकडे येत होता. ट्रक पांगिरे गावाशेजारी पेट्रोल पंपानजीक आला असता अचानक ट्रकचा पुढील ड्रायव्हर बाजूचा टायर फुटला . त्यामुळे ट्रक सरळ समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकला.त्यामुळे मोटरसायकलवरील युवराज महिपती परीट (वय ४३ वर्ष रा. ठिकपुर्ली ता.राधानगरी)हे जागीच ठार झाले . तर नंदकुमार पांडुरंग गायकवाड (वय ४२ वर्ष रा.माजगाव ता.राधानगरी)यांना जखमी अवस्थेत गारगोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पण त्यांचा तेथे मृत्यू झाला.हा अपघात इतका भीषण होता की ट्रक सरळ अंगावरून गेल्याने मोटरसायकलस्वार गंभीर अवस्थेत पडले होते. मोटरसायकलवरील दोघेजण गावाहून कामानिमित्त उत्तुरकडे चालले होते. तर ट्रक बाजूच्या शेतात पलटी झाला त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. ट्रकचालक बाजीराव गायकवाड (रा.गारगोटी ) हे जखमी झाले आहेत. याबाबत भुदरगड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे.

                                        पांगीरे (ता भुदरगड ) येथे झालेल्या अपघातातील ट्रक व मोटारसायकल अशी रस्त्यावर पडली आहे.

   

error: Content is protected !!