IIT मुंबईत मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार

MSK online news

    आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याला मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये डोकावताना पकडल्याची घटना समोर आली आहे. कॅन्टीनमध्ये नाईट ड्युटी करत असलेला हा कर्मचारी रविवारी रात्री मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये डोकावत होता. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यावर तो मुलींचे व्हिडिओही बनवत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
रविवारी रात्री ही बाब समोर आली. मुलींच्या वसतिगृहाच्या बाथरूममध्ये खिडकीतून कोणीतरी डोकावताना एका विद्यार्थिनीने पाहिले. यानंतर त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना याची माहिती दिली. त्याचवेळी आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. इन-हाउस मॅगझिनमध्ये जारी केलेल्या निवेदनानुसार हे प्रकरण वसतिगृह-10 चे आहे. पेस्ट कंट्रोलच्या कामासाठी येथील कॅन्टीन रविवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र येथे काम करणारे कर्मचारी रात्री वसतिगृहाच्या आवारातच थांबले. या निवेदनानुसार, वसतिगृहाच्या इमारतीच्या काही विंगमध्ये बाथरूमच्या खिडक्या प्लॅटफॉर्मप्रमाणे बनवल्या गेल्या आहेत आणि त्या पाईप्सद्वारे तळमजल्याशी जोडलेल्या आहेत. या पाईपच्या साहाय्याने तो खिडकीपर्यंत पोहोचला होता, असे सांगण्यात आले आहे.

एका विद्यार्थिनीने पवई पोलिसांकडे तक्रार केली की रविवारी रात्री आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने हॉस्टेल 10 च्या बाथरूममध्ये तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी कलम 354C (voyeurism) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, कॅन्टीन कर्मचाऱ्याविरुद्ध आयपीसी कलम 354 सी (voyeurism) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री त्या कर्मचाऱ्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

error: Content is protected !!