इचलकरंजी आणि परिसरामध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांसाठी मुंबईतील बाजारपेठ

    इचलकरंजी परिसरामध्ये मोठया प्रमाणात खाद्य पदार्थ, गारमेंट उद्योग आणि इंजिनिअरिंग उद्योग यांची संख्या काही हजारात आहे. ह्या उद्योजकांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना मुंबईतील बाजारपेठ मिळवून देण्यासाठी "उत्कर्ष उद्योजक संस्था आणि आम्ही उद्योजक ग्रुप" सक्रिय झालेला आहे. 

या संदर्भातील एकदिवसीय कार्यशाळा इचलकरंजी शहरामध्ये होत आहे. या कार्यशाळेची तयारी म्हणून पहिली बैठक आज रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या जनसंपर्क कार्यालमध्ये घेण्यात आली. यावेळी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक आम्ही उद्योजक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजू नदाफ यांनी केले. या कार्यशाळेची संकल्पना उत्कर्ष उद्योजक संस्थेचे अध्यक्ष गणेश भांबे यांनी विस्तृतपणे मांडली.

या बैठकीमध्ये मुंबईमधील विक्री व्यवस्थेसाठी आणि इचलकरंजी व परिसरातील उत्पादित होणाऱ्या वस्तुंचे प्रदर्शन आणि वस्तूंची विक्री व्यवस्था उभारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्याला पूर्णपणे ताकत देईल व आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिली. या बैठकीस मोठ्या संख्येने महिला उद्योजिका उपस्थित होत्या. यामध्ये तेजम मसाल्याचे सौ. रुपाली म्हेत्तर, गौरी अगरबत्ती वर्क्सच्या सौ. संतोषी शेट्टी, आरोग्य फूड प्रोडक्टसच्या सौ. प्रतिभा पाटील, मुक्ता प्रोडक्शनच्या सौ. सुजाता गोडसे, कस्तुरी फूड प्रोडक्टसच्या सौ. सुप्रिया सटाले, ज्योती घुणके, ज्योती तुरंबेकर, अंजली मुळे, माधुरी निडगुंदे, पूजा पाटील, श्रुती मुणोली, आरती लोकरे यांच्यासह इतर उद्योजिका उपस्थित होत्य.

error: Content is protected !!