सांगलीत लसीचा तुटवडा , केंद्रांवर लस संपल्याचे फलक

सांगली / प्रतिनिधी

करोना लसीकरण युद्ध पातळीवर सुरू असतानाच जिल्ह्यातील ल काही लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे फलक लावण्यात आले. ज्या केंद्राकडे लस उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्या (गुरुवारी) दुपारपर्यंत लसीकरण होईल असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले. पाच दिवसांपूर्वी दोन लाख लसची मागणी केली असता केवळ ५० हजार डोस उपलब्ध झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील २२२ लसीकरण केंद्रावर करोना प्रतिबंधक लस देण्यात येत असून मंगळवारअखेर २ लाख ४४ हजार ८८६ जणांनी लस टोचून घेतली आहे. दररोज सुमारे १८ हजार लाभार्थी लसीकरणासाठी येत असल्याचे सांगण्यात आले.

मात्र, आरोग्य विभागाकडे बुधवारी केवळ १५ हजार लाभार्थींना देता येईल एवढाच साठा उपलब्ध होता. यामुळे काही केंद्रावर काल दुपारीच हा साठा संपल्याचे चित्र आहे. मिरज तालुक्यातील नांद्रे येथे लस उपलब्ध नसल्याचे लसीकरण होणार नसल्याचे फलक काल दुपारी लावण्यात आला.

error: Content is protected !!