अशोकराव स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजी

वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा १ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप, रक्तदान शिबीर, डोळे तपासणी शिबीर, गो शाळेत चारा वाटप, अनाथालयात जेवण वाटप यासह विविध उपक्रमांचा समावेश आहे. येथील जिजामाता मार्केटमध्ये मध्ये माजी नगरसेवक दिलीप मुथा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
१ एप्रिलला सकाळी अरुण विद्यामंदिर शाळेत मुलांना खाऊ वाटप, गरजु मुलांना दप्तरसह शालेय साहित्य वाटप, अरुण विद्यामंदिरात रक्तदान शिबीर आणि डोळे तपासणी शिबीर, गो शाळेत चारा वाटप, मँचेस्टर वाळु डेपोमार्फत सरबत वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर परिसरातील नागरीकांचे आयुष्यमान कार्ड, आभाकार्ड, पॅनकार्ड काढण्यात येणार असून अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील अनाथालयात जेवण वाटप करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीस सुनील तोडकर, युवराज माळी, धनराज खंडेलवाल अशोक पाटील, चंद्रकांत बडवे, रावसो विठ्ठाणा, राहुल जानवेकर नागेश पाटील बाळकृष्ण कित्तुरे मुन्ना स्वामी, उमाकांत दाभोळे शिवम केसरवाणी, अँड बसवेश्वर स्वामी, वेदांते, शहा कोळी सर प्रशांत गुरव सर, रामचंद्र गुरव, मँचेस्टर वाळू संघटना, पदाधिकारी यांच्यासह स्वामी प्रेमी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!