ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जगन जामदार यांचे निधन

हातकणंगले : येथील ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जगन गणपती जामदार (वय ५६) यांचे सोमवारी सायंकाळी उपचार सुरु असताना निधन झाले. शनिवारी सकाळी कामानिमित्त इचलकरंजीकडे मोटर सायकलवरुन जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांना चक्कर आली. त्यावेळी ते मोटरसायकलवरुन खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. नागरीकांनी त्यांना तत्काळ आयजीएम येथे दाखल केले. त्यानंतर पुन्हा त्यांना कणेरीमठ येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु मेंदुला जबर इजा होऊन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नव्हता. सोमवारी सायंकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!