इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन

इस्लामपूर /ता.५-प्रतिनिधी
      चाळीस वर्षापासुन इस्लामपूर पालिकेच्या राजकारणात अधिराज्य गाजवणारे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ गणपतराव पाटील (वय ७१) यांचे आज शनिवारी निधन झाले. नाम. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक . मुरब्बी, जाणकार राजकारणी म्हूणन विजयभाऊ यांची ओळख होती.

     १९७४ साली विजयभाऊ पाटील यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला सुरुवात केली. त्यांनी पालिकेतील पार्टीची २५ वर्षांची सत्ता उलथून टाकली होती. त्यांनी तीनवेळा नगराध्यक्षपद भूषवले. शहराच्या विविध विकासामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.
     शहरातील कुसूमगंध उद्यान, लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृह, भव्य शॉपिंग सेंटरच्या माध्यमातुन कार्याचा ठसा उमटविला आहे. राजकीय कारकिर्दीबरोबरच इस्लामपूर अर्बन को-आॅप बँक, जय हनुमान नागरी सह. पतसंस्था, विजयभाऊ  पाटील नागरी सह. पतसंस्था, महिला बचत गट, उरूण-इस्लामपूर पाणी पुरवठा संस्था या आदर्श संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.
     गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संदीप, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!