दोन हजारांची लाच घेताना ग्रामविकास आधिकारी रंगेहाथ सापडला …

लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा – सरदार नाळे

हातकणंगले / प्रतिनिधी

कर्ज प्रकरण मंजुरीसाठी राहत्या घराचा गावठाण उतारा देण्याकरिता प्रयाग चिखली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गोरख दिनकर गिरीगोसावी (वय- ५० वर्षे , रा. सध्या – पंतमंदीर जवळ, शिवाजीनगर, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर, मुळ रा.सिंगापूर, ता.पुरंदर,जि.पुणे.) याला दोन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे , पोलीस निरीक्षक बापु साळुंके, पोहेकॉ सुनील घोसाळकर , पो.ना. सचिन पाटील,पो.कॉ. रुपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार पुनम पाटील, पो.हे .कॉ विष्णू गुरव यांनी केली.
याबाबत आधिक माहिती अशी , प्रयाग चिखली येथून कर्ज मंजुरीसाठी लागणारा गावठाण उतारा मिळण्याकरीता फिर्यादी यांनी अर्ज केला होता. गावठाण उतारा देणेसाठी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गिरीगोसावी यांनी तक्रारदार यांचेकडे २०००/- ची मागणी केली . याविरुद्ध तक्रारदार यांनी कोल्हापुर लाचलुचपत विभागाकडे संपर्क साधुन तक्रार दिली. तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने गिरीगोसावी याला लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे.

    तसेच लाचलुचपत विभागाकडून  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की,  कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.  तसेच तक्रार दिल्यानंतर फिर्यादीचे कोणतेही शासकीय काम थांबणार नाही. असे आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांनी केले असुन 9673506555 मो.नं. वरती व या कार्यालयीन क्रमांकावर 0231- 2540989 संपर्क साधण्यासाठी मेल आयडी dyspacbkolapur@gmail.com यावर सुद्धा आपण आपली तक्रार नोंदवू शकता. व  टोल फ्रि क्रं. 1064 असल्याचे कळविण्यात आले असुन दिलेल्या तक्रारीबाबत आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे सांगण्यात आले आहे .
error: Content is protected !!