कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या वारसांना विमा संरक्षण द्या – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर भुदरगड तालुका शाखेची मागणी

गारगोटी /ता.१४-प्रतिनिधी

     मराठवाड्यातील बीड व लातूर जिल्ह्यातील दोन पत्रकार बांधवांचा कोरोना रोगामुळे मृत्यू झाला, त्यांच्या वारसाना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे . या मागणीचे निवेदन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन भुदरगड तालुका शाखेच्या वतीने भुदरगड तहसीलदार अमोल कदम यांना देणेत आले . भुदरगड तालुका शाखेचे अध्यक्ष आनंद चव्हाण यांचे नेतृत्वाखाली ह निवेदन देणेत आले.

         यावेळी देणेत आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील पत्रकार संतोष भोसले व लातूर जिल्ह्यातील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांचा कोरोना उपचारा दरम्यान शासकीय हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला . प्रशासनाने केलेल्या कार्याची दखल आणि वृत्तांत जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य हे पत्रकार करत होते . त्यातच ते कोरोना बाधित झाले आहेत . शिवाय या पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे . त्यामुळे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे या पत्रकारांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण द्यावे . अशी मागणी निवेदनात केली आहे . यावेळी अध्यक्ष आनंद चव्हाण, सचिव अजित यादव,जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र उळेगड्डी, संघटक बाळासाहेब कवडे, मारुती घाटगे, शिवाजी खतकर, प्रकाश खतकर, मोहन पाटील,अरविंद चोडणकर, नामदेव पाटील, सहदेव साळोखे,शामराव पाटील, संदीप पाटील, शंकर पाटील, डॉ. परशराम देवाळे, सुनील खोत, दत्तात्रय वारके, एकनाथ कांबळे यांचेसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते .

error: Content is protected !!