विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाचा फलक फाडल्याने कबनूरमध्ये तणाव

कबनूर ता हातकणंगले येथील कबनूर – चंदूर रोडवरील दत्तनगरातील तीन नंबरच्या गल्लीतीळ कोपऱ्यावर असलेला विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाचा फलक अज्ञाताने फाडल्याचे आज (दि.२६) सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत या घटनेचा तीव्र निषेध केला व दत्तनगर बंदची हाक दिली.

यावेळी भागातील दुकानदार, व्यावसायिक यांनी दुकाने बंद केली. कार्यकर्त्यांनी मोटर-सायकल रॅली काढून कबनूर बंदची हाक दिली. आवाहनाला प्रतिसाद देत कबनूर गाव बंद ठेवण्यात आले. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण बनले होते.

  दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसिलदार यांनी दत्तनगरला भेट दिली. या घटनेचा तपास करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. यावेळी बजरंग दलाचे दत्ता पाटील, पंढरीनाथ ठाणेकर, महेश कोरवी, सचिन वडर, राजू शिंदे, भिकाजी चौगुले, भूषण भिऊंगडे, कृष्णात मगर, आण्णा साळुंखे, आण्णा सुतार आदीसह इचलकरंजी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!