विठू माऊली

नाद घुमतो डोंगरदऱ्यातून
सह्याद्री च्या घाटातून
युगांयुगे तुझा जयजयकार
या मातीतून या रक्तातून
पण हे सारे या साली विस्कळीत झाले या चरातून
तूच दिलेस क्षण दुःखाचे
तूच दिलेस अनंत क्षण सुखाचे,
गरिबास ही दिले दोन घास भाकरीचे
आता कुठे चालली होती गाडी सुरळीत या संसाराची
दृष्ट लागली या साऱ्यास
होत्याचे नव्हते झाले
हे न कधी कळले आम्हास
या रुपी येऊन तू
जीव केलास उदास
तू धारण केले अनेक रूप
कधी डॉक्टर, नर्स, पोलीस
अगदी सफाई ही केलीस
तुला नेहमी पाहिले रे भरजरी वस्त्रात
पण आता तू दिसतोस पांढऱ्या खाकी वेशात
असे तुला बघणे नाही सहन होत रे या जीवास
हा खेळ आहे क्षणाचा हे जरी सत्य असले तरी जीव घुसमटतो या खेळात
तूच घेऊन येशील दवा पाणी या लेकरास.

msk

मीच परका झालो आहे या खेळात
तुझ्या कडे येऊन साकडे घालीन तुला
पण तुही झालास रे बंदीवास
का असा छळतो आहेस रे
तुझ्या लेकरास
तूच आहेस माझी माऊली ,
तूच माझा बाप,
तूच माझा सखाहरी
तूच माझा कैवारी
तूच सोडव आता आम्हास या आजारातूनी
हेच मागणे आहे तुझ्या चरणी
हेच साकडे घालते तुला या दिनी
विठोबा माऊली,  ज्ञानराज माऊली तुकाराम,
जय जय राम कृष्ण हरी
नाद घुमवतो चंद्रभागेच्या तीरी
जय जय राम कृष्ण हरी
हाच नाद घुमदे दरवर्षी युगांयुगे…
                                                                  सौ.स्मिता मनोज जोशी.

error: Content is protected !!