विठ्ठल-रुक्मिणीचे ‘पदस्पर्श दर्शन’ तब्बल दीड महिना राहणार बंद

कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्च पासून बंद राहणार आहे. मात्र भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ या कालावधीत मुख दर्शन घेता येणार आहे. या शिवाय मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. आषाढी पूर्वी गाभाऱ्यातील सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. तसेच या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. मात्र पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार असे औसेकर महाराज यांनी सांगितले.Pandharpur Breaking News

हातकणंगले लोकसभेसाठी माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु झाले आहे. या कामी राज्य सरकारने निधी उपलब्ध केला आहे. पुरातत्व विभागाने मंदिरात नव्याने केलेले बांधकाम, ग्रेनाईट फरशी, टाईल्स, लाईट फिटिंग, दर्शन रांग,ऑईल पेंट आदी काढून मंदिराचे मूळ रूप, पुरातन स्वरूप प्राप्त करून देणार आहे. याचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आणि मंदिरातील महालक्ष्मी मंदिर आणि बाजीराव पडसाळी येथील काम सुरु झाले आहे. आता श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्याचे काम करायचे आहे. यामध्ये गाभाऱ्यातील ग्रेनाईट फरशी, ऑईल पेंट,सिंमेट आदी काढून त्या ठिकाणी दुरुस्ती करावयाची आहे. त्यासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये आणि आषाढी पूर्वी कामे पूर्ण व्हावीत, याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, वारकरी, महराज मंडळी, जिल्हाधिकारी यांची बैठक येथील भक्त निवास येथे पार पडली.

error: Content is protected !!