दानचंद घोडावत ट्रस्टतर्फे २२ डिसेंबरला माणुसकीची भिंत उपक्रम

    रोटरी क्लब जयसिंगपूर संचलित व स्व. दानचंद खिवराज घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित माणूसकीची भिंत उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उद्योगपती विनोदभाऊ घोडावत व असि. श्रीकिशन भुतडा यांच्या उपस्थितीत होणार आहे. येथील शिरोळ रोडलगत ११ व्या गल्लीतील हनुमान मंदिराशेजारी हा कार्यक्रम होत आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय माणगांवे यांनी दिली. 
 उद्योगपती विनोदभाऊ घोडावत यांनी स्वतःची जागा व आकर्षक पध्दतीचे त्यावरील बांधकाम करुन माणुसकीची भिंत या सदराखाली हा प्रकल्प उभा केला आहे. शहर व परिसरातील गरीब गरजू लोकांसाठी महिला, मुली, लहान मुले यांचेसाठी जुनी व नवी अशा स्वरुपाची लोक संग्रहातून एकत्र केलेली वस्त्रे व खेळणी याठिकाणी उपलब्ध केली जाणार आहेत. यासाठी रोटरी क्लब व श्री. दानचंद घोडावत फॅमिली ट्रस्टने विशेष पत्रक काढून जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या घरातील जुनी सुस्थितीत असलेली कपडे दान करावीत. त्याचप्रमाणे लहान मुलांची खेळणी, सायकली दान करावीत, असेही आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन घोडावत परिवार, जयसिंगपूरातील दानशूर नागरिक व सेक्रेटरी विद्यासागर आडगाणे, प्रोजेक्ट चेअरमन भरत माणगांवे, खजिनदार गौतम झेले यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी नागरिकांनी यामध्ये वस्त्रे, कपडे दान करावीत व या अभिनव अशा उपक्रमास सहकार्य करुन गरीब गरजूच्या पाठीशी आपल्या मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे
error: Content is protected !!