खोची / ता : ७
खोची येथील वारणा नदीच्या पाणीपातळीत थोडी घट झाली आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होणारी वाढ थांबली आहे. सायंकाळी नदी पाणी पातळी धारेवर एक फुट उंचीने कमी झाली आहे. त्यामुळे वारणा काठच्या रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. सलग दोन दिवस चांगली उघडीप मिळाल्याने पाणी पातळीत घट होण्यास मदत झाली. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
नदीकाठसह,सखल भागात पुराचे पाणी येणाऱ्या रहिवाशांना स्थलांतरास इतर सूचना देण्यात आल्या आहेत. तहसीलदार प्रदीप उबाळे, मंडलाधिकारी गणेश बरगे, तलाठी रविंद्र कांबळे, पाटबंधारे एस एस खोत, कोतवाल अर्चना आडके, आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.